Author: Waheed Gaffar Khan

महाराष्ट्रातील कल्याणमध्ये मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्येचा आरोपी विशाल गवळीने तळोजा तुरुंगात आत्महत्या केली. मुम्बई (अमित कुमार )विशाल गवळी शौचालयात गेला आणि त्याने टॉवेलने गळफास घेतल्याचा आरोप आहे. नंतर तुरुंग अधिकाऱ्यांना मृतदेह सापडला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.महाराष्ट्रातील कल्याण येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्येतील मुख्य आरोपी विशाल गवळीने नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. खारघर पोलिसांनी घटनेची पुष्टी केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

Read More

चांदूर बिस्वा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा स्फोट; सरपंच पतीवर गंभीर आरोप चांदूर बिस्वा (ता. नांदुरा): गावातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पती श्री. प्रकाश बोडवडे यांच्या हस्तक्षेपामुळे गंभीर प्रकारचे अनियमित व्यवहार, भ्रष्टाचार व अवैध व्यवसायांना अभय मिळाल्याची तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांनी जिल्हा प्रशासन व ग्रामविकास विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. गावाच्या मुख्य चौकात आणि सार्वजनिक रस्त्यांवर बिनधास्तपणे अनधिकृत चिकन विक्री सुरू आहे. त्यामुळे शाकाहारी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, स्वच्छता व आरोग्यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे. यासोबतच, सरपंच पती श्री. बोडवडे यांनी ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेत कोणतीही परवानगी न घेता…

Read More

भोसे, खेड : होली एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल (भोसे) येथे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. शाळेच्या प्राचार्या सौ. प्रतिक्षा घुगे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश रासकर सर आणि योगिता रासकर मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीतील योगदानाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले यांचे विचार आणि शिक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा याची माहिती देत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

Read More

काल ‘माल’ आला… १५,००० लिटर बायोडिझेल भूमिगत टाकीत लपवले! मलकापूर (प्रतिनिधी) – मलकापूर शहरात बायोडिझेल माफियांचे धाडसी कारनामे पुन्हा एकदा उघडकीस आले असून, फौजी ढाबा, धारागाव (शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत) येथे तब्बल १५,००० लिटरपेक्षा अधिक ज्वलनशील बायोडिझेलचा साठा भूमिगत टाकीत लपवण्यात आला आहे. सोमवार, दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १०.१५ वाजेच्या दरम्यान व्होल्सले माफिया चिराग यांच्या टँकरद्वारे हा साठा आणण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.या अवैध साठ्याचे मुख्य सूत्रधार म्हणून साबीर कुरेशी, शेख इमरान लुकमान बॉस आणि जुबेर टोपी (फर्निचर) या तिघांची नावे पुढे येत असून, या साठ्यामागे शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश गिरी यांचे वरदहस्त असल्याची…

Read More

कोंढवा खुर्द परिसरात कचऱ्याचा ढिगारा; नागरिकांच्या आरोग्यावर धोकापुणे – कोंढवा खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा साठा झाल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हा कचरा गेल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेला नाही, त्यामुळे डास, माश्या यांचा प्रादुर्भाव वाढला असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या असतानाही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. कचऱ्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांचा धोका निर्माण झाला असून, लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.”दररोज दुर्गंधीमुळे घराच्या खिडक्या उघडता येत नाहीत. डास आणि माश्यांमुळे दिवसभर त्रास होतो,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.नागरिकांनी या समस्येकडे महापालिकेने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.…

Read More

नाशिक: दिंडोरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता, शिस्तभंग नियमांचे उल्लंघन करत खासगी वृत्तपत्रांकडून बेकायदेशीररीत्या पुरस्कार स्वीकृत केले आहेत. याबाबत निगडोळ येथील रहिवासी भास्कर मालसाने यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार दिंडोरी तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायतच्या अधिकारी श्रीमती वनिता चौधरी, कुर्णोली ग्रामपंचायतीच्या श्रीमती राजश्री सनेर, तसेच श्रीमती वैशाली बागुल, श्रीमती रोहिणी काथपुरे आणि श्री रामदास गायखे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता मीडिया समूहाशी संलग्न पुरस्कार स्वीकृत केले आहेत. शासनाच्या नियमांनुसार, कोणताही शासकीय कर्मचारी आकाशवाणीवरील ध्वनीप्रक्षेपण, दूरदर्शनवरील कार्यक्रम, वृत्तपत्र किंवा नियतकालिकांमधील लेख किंवा पत्रलेखन,…

Read More

वडनेर भोलजी (ता. नांदुरा) – वडनेर भोलजी गावातील ओपी हद्दीत काही ठिकाणी अवैधरित्या ज्वलनशील बायोडिझेल पदार्थांची साठवणूक व विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतरही पोलीस विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, हे विशेष! जागृत नागरिकाची तक्रार, प्रशासनाचे दुर्लक्ष या प्रकरणी ‘दैनिक जागृत मालक’तर्फे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे अनेक वेळा माहिती देण्यात आली होती. मात्र, आजतागायत कोणतीही कार्यवाही न झाल्याने हा प्रकार थेट बुलढाणा पोलिस कंट्रोल रूम कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पोलीस कंट्रोल रूम कार्यालयाने तत्काळ स्थानिक पोलीस विभागाला योग्य ती सूचना दिली आहे. पोलिसांचा सहभाग? गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार, हा अवैध बायोडिझेलचा साठा…

Read More

मनपा एम पश्चिम विभागातील जल विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जनआक्रोश; वृद्ध महिलेनं फिनायल पिऊन आत्महत्येचा केला प्रयत्न मुंबई, चेंबूर | प्रतिनिधीमुंबई : चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावरील नागवाडी परिसरात मनपा एम पश्चिम विभागातील जल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक जनतेत तीव्र रोष पाहायला मिळत आहे. येथील सहायक जल अभियंता मिथुन भिसे, सब इंजिनिअर करमरकर, ज्युनियर इंजिनिअर मंचेकर आणि मुकादम संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कादरिया नगर, नागवाडी परिसरात हजारो लोकांनी अवैध नलजोडणी घेतली असून, त्या बदल्यात या अधिकाऱ्यांकडून दररोज अवैध वसूली केली जाते. विशेष म्हणजे, अधिकृत नलजोडणी घेणाऱ्यांकडूनही जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहेत. मुकादम…

Read More

सचिनच्या बायो डिझेल पंपाला पोलिस कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद? – अवैध साठवणुकीमुळे नागरिक धास्तावलेनांदुरा (प्रतिनिधी): वडनेर भोलजी परिसरात सुरु असलेल्या अवैध बायो डिझेल साठवणुकीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सचिन नावाच्या इसमाचा हा बायो डिझेल पंप एका नामांकित पोलिस कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सचिन हा कोणत्याही अधिकाऱ्याची भीती न बाळगता दिवस-रात्र ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थांची साठवणूक व विक्री करत आहे. हा धंदा सुरू राहण्यासाठी त्याला पोलिस कर्मचारी विक्रम राजपूत यांचा सक्रिय पाठींबा लाभत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, विक्रम राजपूत हे ‘माऊली ढाबा’चे मालक यांचे नातेवाईक असून, त्यामुळेच पोलीस…

Read More

मलकापूर (प्रतिनिधी) : मलकापूर येथील MIDC टोल टॅक्स जवळ, दसरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बायो डिझेल पंपद्वारे अवैधरीत्या ज्वलनशील पदार्थ साठवून त्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमजद हनीफ खान यांनी प्रशासनाला सांगितले होते की त्यांचा बायो डिझेल पंप बंद आहे कारण त्यांची तब्येत खराब आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांचा मुलगा शाहिद अमजद खान हा पंप सुरु ठेवून अवैधरित्या बायो डिझेलचा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे.विशेष म्हणजे या पंपाची टाकी जमिनीत लपवून ठेवण्यात आली असून, कोणतेही परवाने वा अधिकृत कागदपत्रे नसताना खुलेआम ज्वलनशील पदार्थाची साठवणूक व विक्री केली जात आहे. हे सर्व प्रकार…

Read More