नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
बुलढाणा, 27 मे 2025:
‘आपले सरकार’ पोर्टलवर बुलढाणा जिल्हा पोलीस विभागाच्या संपर्कासाठी दर्शविण्यात आलेला मोबाईल क्रमांक 9146822360 चुकीचा असून तो आधीच बदली झालेल्या एका महिला अधिकाऱ्याचा आहे. या क्रमांकावर नागरिक सतत पोलीस तक्रारीसाठी कॉल करत असल्याने संबंधित महिलेचा मानसिक त्रास होत आहे. यासंदर्भात DIS/HOMD/BULD/2025/88 दिनांक 20/05/2025 प्रमाणे बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक (SP) यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
तथापि, धक्कादायक बाब म्हणजे सदर तक्रार कुठलाही संबंध नसताना मलकापूर SDPO कार्यालयाकडे पाठविण्यात आली. तक्रारकर्त्याच्या मते, ही कृती हेतुपुरस्सर असून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारीची योग्य ती दखल न घेतल्याने तक्रारकर्त्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारदाराने आपल्या अर्जात पुढील गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत:
1. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील चुकीचा मोबाईल क्रमांक तातडीने दुरुस्त करण्यात यावा.
2. तक्रारीची चुकीची पाठवणी का व कशी झाली याची चौकशी करावी.
3. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.
4. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी सार्वजनिक संपर्क क्रमांकांची नियमित तपासणी (audit) केली जावी.
तक्रारकर्त्याचे आणखी गंभीर आरोप:
तक्रारकर्त्याच्या मते, ‘आपले सरकार’ पोर्टल हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंग्रेजी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी इंग्रजीत दाखल केलेला अर्ज समजून घेतला नाही. त्यामुळे तक्रार विनाकारण चुकीच्या पत्त्यावर पाठवली गेली. त्यांना असेही वाटते की संबंधित कर्मचारी नशेच्या अवस्थेत नोकरी करत होते किंवा त्यांनी हेतुपुरस्सर त्रास देण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी तक्रारकर्त्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे.
Trending
- बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु
- साजिद मोहम्मद खान – निस्वार्थ सेवाभावाचा चेहरा, सचोटी आणि विश्वासार्ह नेतृत्वाचं प्रतीक