Author: Waheed Gaffar Khan

मलकापूर (प्रतिनिधी) —राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या इरफानच्या अमन हॉटेल येथे सुरू असलेले अवैध बायो-डिझेल पंप प्रशासनाच्या आदेशांना उघडपणे आव्हान देत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) आणि अप्पर पोलीस अधीक्षक (ASP) यांनी सर्वच अवैध धंदे बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही काही खासधारकांचे व्यवसाय मात्र धडाक्यात सुरूच आहेत.सध्या चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे — हे धंदे सुरू ठेवण्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे? स्थानिक पोलिसांच्या नजरेआड हे कसे चालू शकते?काय खरंच पोलिस हतबल आहेत की वरून आदेश येत आहेत?सदर अमन हॉटेलच्या परिसरात अवैध बायो-डिझेलचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असून, हा इंधनपुरवठा ना कोणत्याही अधिकृत परवानगीने होतोय, ना कायदेशीर बंधनांचं पालन केलं जातंय. हा…

Read More

बुलढाणा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेत मोठा फेरबदल करत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी चार पोलिस निरीक्षकांची तात्पुरती बदली आदेशाद्वारे जाहीर केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ आणि महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अध्यादेश-२०१५ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या २१ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.या आदेशानुसार पुढील पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे: 1. पोनि जयवंत रघुनाथ सातव सध्याची नेमणूक – नियंत्रण कक्ष, बुलढाणा नवीन नेमणूक – ठाणेदार, नांदुरा पोलीस स्टेशन पोनि विलास पाटील यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते. 2. पोनि सतिष दत्ताराम महल्लेसध्याची नेमणूक – नियंत्रण कक्ष, बुलढाणानवीन…

Read More

विश्वासघात करणारा अधिकारी – विश्वास गमावलेली यंत्रणा, वरिष्ठांची व तक्रारदारांची फसवणूक उघड!जनतेचे एकच स्पष्ट म्हणणे आहे –”खोटा अहवाल सादर करणारे अधिकारी नकोत. सुधीर पाटील यांना त्वरित शिपाई पदावर पाठवा!” मलकापूर (प्रतिनिधी) – एका तांत्रिक स्वरूपाच्या साध्या तक्रारीवर खोटा, दिशाभूल करणारा आणि मानसिक त्रास देणारा चौकशी अहवाल सादर करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची व तक्रारकर्त्याची फसवणूक करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मलकापूर, श्री. सुधीर पाटील यांच्यावर आता कारवाईची मागणी जोर धरत आहे.मुख्य संपादक वहीद खान (दैनिक जागृत मालक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २० मे २०२५ रोजी “आपले सरकार सेवा पोर्टल”वर एका चुकीच्या मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु…

Read More

विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती समस्या सोडविण्यासाठी बुलढाण्यात दाखल… एसपी ऑफिसमध्ये तणाव! आत काय घडतंय? जिल्ह्याचे एसपी कोण? पानसरे की तांबे…. दोघेही एसपी ऑफिसमध्ये… पानसरेंनी खुर्चीचा ताबा घेतल्याची चर्चाबुलढाणा (प्रतिनिधी):बुलढाणा जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या देखरेखीसाठी नेमले गेलेले सर्वोच्च पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी), सध्या खुर्चीसाठीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकाचवेळी दोन एसपी ऑफिसात दाखल झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्याचे एसपी नेमके कोण? असा पेच जिल्ह्यात निर्माण झाला आहे.खुर्चीचा संघर्ष – पानसरे Vs. तांबेगेल्या आठवड्यात एसपी विश्व पानसरे यांची बदली करण्यात आली होती आणि त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नियुक्ती झाली होती. तांबे यांनी नियुक्तीच्या दिवशीच पदभार स्वीकारून कामकाज सुरू केलं…

Read More

जागृत मालक | प्रतिनिधी : मोहम्मद नदीम …शहरातील गरिबांसाठी स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शहरी आवास योजना (PMAY-U) अंतर्गत लाखो शहरी गरीब, कामगार, स्थलांतरित कुटुंबे, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून दिले जात आहे. 2015 पासून सुरू झालेली ही योजना आता अधिक व्यापक व लाभदायक स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचत आहे.घरकुलाचे स्वप्न आता वास्तवात!या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 2.30 लाख रुपयांपर्यंत थेट आर्थिक मदत दिली जाते. तसेच, गृहकर्जावर व्याज सवलतीचा लाभ देखील मिळतो. विशेष बाब म्हणजे, या योजनेचा लाभ घेताना अर्जदाराच्या कुटुंबात महिलांचे नाव घरावर असणे आवश्यक आहे, ज्यामुळे महिलांना घराच्या…

Read More

नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळबुलढाणा, 27 मे 2025:‘आपले सरकार’ पोर्टलवर बुलढाणा जिल्हा पोलीस विभागाच्या संपर्कासाठी दर्शविण्यात आलेला मोबाईल क्रमांक 9146822360 चुकीचा असून तो आधीच बदली झालेल्या एका महिला अधिकाऱ्याचा आहे. या क्रमांकावर नागरिक सतत पोलीस तक्रारीसाठी कॉल करत असल्याने संबंधित महिलेचा मानसिक त्रास होत आहे. यासंदर्भात DIS/HOMD/BULD/2025/88 दिनांक 20/05/2025 प्रमाणे बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक (SP) यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.तथापि, धक्कादायक बाब म्हणजे सदर तक्रार कुठलाही संबंध नसताना मलकापूर SDPO कार्यालयाकडे पाठविण्यात आली. तक्रारकर्त्याच्या मते, ही कृती हेतुपुरस्सर असून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारीची योग्य ती दखल न घेतल्याने…

Read More

‘मोहता शाळा’जवळील दुकानातून लहान मुलांच्या भविष्यात विष कालवले जात आहे!“मी दर महिन्याच्या १ तारखेला API श्री. जगदीश बांगर यांना ४८०० रुपये हप्ता देतो, त्यामुळे कोणी काही करत नाही.” गुटखा माफियाबुलढाणा (प्रतिनिधी : बाबा मिर्झा)नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडनेर भोलजी येथे ‘मोहता शाळा’ जवळील माऊली स्टोअर्ससमोर असलेल्या एका दुकानात अवैधपणे विमल गुटख्याची होलसेल विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या दुकानातून लहान मुलांपासून ते शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत गुटखा विकला जात असून, स्थानिक पोलीस प्रशासनाने याकडे डोळेझाक केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.२५ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, ‘दैनिक जागृत मालक’चे प्रतिनिधी बाबा मिर्झा यांनी या दुकानात स्वतः जाऊन मोठ्या…

Read More

राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : बुलडाणा जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरुबुलडाणा, महाराष्ट्र – जिल्ह्यात ज्वलनशील पदार्थांच्या अवैध साठवणुकीस व विक्रीस बंदी असतानाही, नांदुरा पोलीस स्टेशन व वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत बायोडिझेलचे अवैध पंप सर्रासपणे सुरू असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या बेकायदेशीर व्यवहाराला महसूल, पोलीस व पुरवठा विभागाच्या काही अधिकाऱ्यांचे “आशीर्वाद” लाभल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.विशेष म्हणजे, इमरान घासलेटवाले व इतर काही व्यक्ती रात्रंदिवस बायोडिझेलचा व्यापार करत असून, हे पंप राष्ट्रीय महामार्गालगत सुरू आहेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत.स्थानिकांनी याप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक (@DGPMaharashtra), मुख्यमंत्री (@CMOMaharashtra) आणि…

Read More

“नेतृत्व पदाने नाही, सेवाभाव, सचोटी आणि विश्वासाने मिळतं – साजिद भाई त्याचं जिवंत उदाहरण आहेत.”

Read More

बुलढाणा: भरधाव टिप्परच्या धडकेत दोन नातवंडांचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी टिप्पर पेटवलाबुलढाणा (९ मे) – जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. वाळू, गिट्टी, मुरूम वाहून नेणाऱ्या टिप्पर वाहनांच्या बेजबाबदार आणि भरधाव वाहतुकीमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. अशाच एका धक्कादायक घटनेत आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास माऊली फाटा, भेंडवळ येथे एका भरधाव टिप्परच्या धडकेत दोन बालकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या आजी-आजोबांना गंभीर दुखापत झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, प्रकाश महादेव खेडकर हे आपल्या पत्नी साधना खेडकर आणि दोन नातवंडांसोबत – पार्थ चोपडे (वय ६, रा. राजापेठ, अमरावती) व युवराज भागवत (वय ५, रा. वडनेरा) – दोनचाकी वाहनाने पळशी सुपो येथून शेगाव…

Read More