मलकापूर (प्रतिनिधी) —
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या इरफानच्या अमन हॉटेल येथे सुरू असलेले अवैध बायो-डिझेल पंप प्रशासनाच्या आदेशांना उघडपणे आव्हान देत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) आणि अप्पर पोलीस अधीक्षक (ASP) यांनी सर्वच अवैध धंदे बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही काही खासधारकांचे व्यवसाय मात्र धडाक्यात सुरूच आहेत.
सध्या चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे —
हे धंदे सुरू ठेवण्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे?
स्थानिक पोलिसांच्या नजरेआड हे कसे चालू शकते?
काय खरंच पोलिस हतबल आहेत की वरून आदेश येत आहेत?
सदर अमन हॉटेलच्या परिसरात अवैध बायो-डिझेलचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असून, हा इंधनपुरवठा ना कोणत्याही अधिकृत परवानगीने होतोय, ना कायदेशीर बंधनांचं पालन केलं जातंय. हा धंदा केवळ पर्यावरणविरोधी नाही, तर वाहनधारकांच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण करणारा आहे.
प्रश्न निर्माण होतो —
पोलिस प्रशासनाचे आदेश अव्हेरून असे धंदे चालू कसे?
कोणते अधिकारी/राजकीय नेते या मागे आहेत?
काय ही ‘मिलीभगत’ जनतेच्या सुरक्षेच्या बदल्यात केली जात आहे?
जनतेत संताप:
सामान्य नागरिकांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी आहे. मोकळेपणाने चालणाऱ्या गैरव्यवहारावर कोणीही कारवाई करत नसेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमची मागणी:
🔹 जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी
🔹 दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
🔹 अमन हॉटेल येथे बायो-डिझेलच्या अवैध पंपांवर छापे टाकावेत
कायद्याच्या नावावर हा थट्टेचा खेळ थांबवायचा असेल, तर प्रशासनाने आता कृती दाखवलीच पाहिजे — अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल!
Trending
- अवैध बायो-डिझेल धंद्यांना पोलिसांचं वरून संरक्षण?
इरफानचं अमन हॉटेल बनलं ‘बायो-डिझेल’चा गैरव्यवहार केंद्र! - बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु