विश्वासघात करणारा अधिकारी – विश्वास गमावलेली यंत्रणा, वरिष्ठांची व तक्रारदारांची फसवणूक उघड!
जनतेचे एकच स्पष्ट म्हणणे आहे –
“खोटा अहवाल सादर करणारे अधिकारी नकोत. सुधीर पाटील यांना त्वरित शिपाई पदावर पाठवा!”
मलकापूर (प्रतिनिधी) – एका तांत्रिक स्वरूपाच्या साध्या तक्रारीवर खोटा, दिशाभूल करणारा आणि मानसिक त्रास देणारा चौकशी अहवाल सादर करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची व तक्रारकर्त्याची फसवणूक करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मलकापूर, श्री. सुधीर पाटील यांच्यावर आता कारवाईची मागणी जोर धरत आहे.
मुख्य संपादक वहीद खान (दैनिक जागृत मालक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २० मे २०२५ रोजी “आपले सरकार सेवा पोर्टल”वर एका चुकीच्या मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु ही तक्रार सायबर तज्ज्ञांकडे जाण्याऐवजी, थेट मलकापूर SDPO सुधीर पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आली आणि त्यांनी मुद्दामहून एक खोटा व अपुरातपुुरा अहवाल सादर केला.
सत्यस्थितीची मोडतोड – सूडबुद्धीचा घाणेरडा नमुना
सदर अहवालात मूळ तक्रारीचा संदर्भ बदलून, तक्रारकर्त्याला गुन्हेगारी छायेत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाटील यांनी ना प्रत्यक्ष संवाद साधला, ना कोणतीही तांत्रिक चौकशी केली. मात्र त्यांनी स्वतः चौकशी केली असल्याचे भासवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवले.
याप्रकरणी श्री. खान यांनी असा आरोप केला आहे की, “सुधीर पाटील हे मानसिक असंतुलनाच्या स्थितीत किंवा नशेच्या प्रभावाखाली असावेत, अन्यथा इतक्या हलगर्जीपणे आणि खोटेपणाने अहवाल तयार होणे शक्यच नाही.”
कारवाईसाठी जोरदार मागणी
संपादक खान यांनी मागणी केली आहे की –
सुधीर पाटील यांच्यावर प्रशासकीय व विभागीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी,
अधिकारी पदावरून हटवून त्यांना शिपाई किंवा कनिष्ठ कार्यालयीन पदावर बदली करावी,
भविष्यात अशी फसवणूक टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेला कठोर व लेखी सूचना द्याव्यात.
विश्वासघात करणारा अधिकारी – विश्वास गमावलेली यंत्रणा
संपूर्ण घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष आहे. एक साधी सेवा मागणी फसवणूक, अपप्रचार आणि मानसिक त्रासात परिवर्तित झाली. पोलीस खात्यातील वरिष्ठ पातळीवर ही बाब गंभीरतेने घेतली जात नसल्यास, यंत्रणेवरचा जनतेचा विश्वास उध्वस्त होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
जवाबदारी न स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना पायउतार करा!
आजच्या युगात लोकशाहीची खरी ताकद माहितीचा अधिकार आणि जबाबदार प्रशासनात आहे. पण जर अधिकारीच नशेत, सूडबुद्धीत व भ्रष्ट प्रवृत्तीने वागू लागले तर समाजात कायद्याचा धाक उरणार नाही.
जनतेचे एकच स्पष्ट म्हणणे आहे –
“खोटा अहवाल सादर करणारे अधिकारी नकोत. सुधीर पाटील यांना त्वरित शिपाई पदावर पाठवा!”
Trending
- अवैध बायो-डिझेल धंद्यांना पोलिसांचं वरून संरक्षण?
इरफानचं अमन हॉटेल बनलं ‘बायो-डिझेल’चा गैरव्यवहार केंद्र! - बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु