बुलढाणा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेत मोठा फेरबदल करत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी चार पोलिस निरीक्षकांची तात्पुरती बदली आदेशाद्वारे जाहीर केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ आणि महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अध्यादेश-२०१५ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या २१ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार पुढील पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे:
1. पोनि जयवंत रघुनाथ सातव
सध्याची नेमणूक – नियंत्रण कक्ष, बुलढाणा
नवीन नेमणूक – ठाणेदार, नांदुरा पोलीस स्टेशन
पोनि विलास पाटील यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते.
2. पोनि सतिष दत्ताराम महल्ले
सध्याची नेमणूक – नियंत्रण कक्ष, बुलढाणा
नवीन नेमणूक – ठाणेदार, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन
मलकापुर ग्रामीण ठाण्यात पोलीस निरीक्षक पद मंजूर असल्यामुळे ही नियुक्ती.
3. पोनि किशोर गोरख तावडे
सध्याची नेमणूक – नियंत्रण कक्ष, बुलढाणा
नवीन नेमणूक – ठाणेदार, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन
पोनि विजयकुमार चव्हाण यांच्या बदलीमुळे रिक्त पदावर ही नियुक्ती.
4. पोनि सिताराम मंजाजी मेहेत्रे
सध्याची नेमणूक – नियंत्रण कक्ष, बुलढाणा
नवीन नेमणूक – ठाणेदार, बोराखेडी पोलीस स्टेशन
पोनि सारंग नवलकार यांना कार्यमुक्त केल्याने ही बदली झाली आहे.
सपोनि संदिप काळे हे मलकापुर ग्रामीण पोलीस स्टेशनवरच दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रलंबित गुन्हे, तपास पत्रे, अर्ज व चौकशीसंबंधी सर्व कागदपत्रे इतर अधिकारी/शाखांना सुपूर्द करून तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या कारवाईमुळे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्षमतेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांना सविनय सादर करण्यात आले असून, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच लेखा, आस्थापना, वेतन लिपिक, कार्यालयीन कर्मचारी आदींना याची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे.
Trending
- बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु
- साजिद मोहम्मद खान – निस्वार्थ सेवाभावाचा चेहरा, सचोटी आणि विश्वासार्ह नेतृत्वाचं प्रतीक