
भोसे, खेड : होली एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल (भोसे) येथे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. शाळेच्या प्राचार्या सौ. प्रतिक्षा घुगे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश रासकर सर आणि योगिता रासकर मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीतील योगदानाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले यांचे विचार आणि शिक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा याची माहिती देत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
