
आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी डॉ.तुषार सनंसे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष श्री मेहबूब शेख यांनी केली.जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगेस पक्ष वाढण्यासाठी व खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष पदी विवेक बिऱ्हाडे,युवक प्रदेश सचिव पदी योगेश राजेंद्र पाटील (गोलू राजपूत) यांची नियुक्ती केली तर नियुक्ती पत्र देताना प्रदेश संघटक सचिव शांतीलाल साळी,जिल्हा अध्यक्ष श्री एन डी पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष आत्माराम नगराळे,फरीद पठाण,युसुफ खाटीक,प्रेम यादव ,आशिष गावित,पंकज पाटील,अतुल पगारे,मयूर साळवे,सलाम पठाण उपस्थित होते
