नांदुरा (प्रतिनिधी) – नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत IPL सामन्यांदरम्यान दररोज तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक सट्टा जुगाराची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व पत्रकारांनी वेळोवेळी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, IPL सट्टा रॅकेटच्या मुख्य माफिया जुगाऱ्यांची यादी संपूर्ण तपशीलासह – नाव, ठिकाण, मोबाईल नंबर, आर्थिक व्यवहाराचे पुरावे, परिवाराचे बँक खाती, Google Pay, PhonePe चा वापर – अशा स्वरूपात प्रकाशित करण्यात आली होती. तरीही या जुगार साखळीवर स्थानिक पोलिस प्रशासनाने कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई केली नाही, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नांदुरा शहरात काही हॉटेल, चौक आणि विशिष्ट ठिकाणी खुलेआम वरळी मटका व जुगार सुरू असल्याची माहिती नागरिक देत आहेत. हे सर्व जुगार अड्डे स्थानिक गुन्हेगारी व्यक्तींच्या आश्रयाने आणि पोलिसांच्या सहकार्याशिवाय शक्य नसल्याची चर्चा नागरिकांत आहे. अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी, सामान्य जनतेने याबाबत तक्रारी दिल्या असूनही पोलीस प्रशासन फक्त दर्शनी पातळीवर हालचाल करताना दिसत आहे, तर प्रत्यक्षात मुख्य सूत्रधारांवर कोणतीही कार्यवाही होत नाही.
हे जुगार नेटवर्क, मोबाईल, फोन कॉल्स आणि डिजिटल पेमेंट्सच्या माध्यमातून चालवले जात असून त्यामुळे प्रमाणबद्ध पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता अधिक आहे, असे जाणकार सांगतात. मात्र स्थानिक पोलीस दलाने आजवर अशा आर्थिक व्यवहारांची कोणतीही चौकशी केली नाही, हे खेदजनक आहे.
या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच राज्य शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. अन्यथा पोलीस आणि माफिया यांची साठगाठ असल्याचा संशय अधिक बळावेल.
Trending
- बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु
- साजिद मोहम्मद खान – निस्वार्थ सेवाभावाचा चेहरा, सचोटी आणि विश्वासार्ह नेतृत्वाचं प्रतीक