वडनेर भोलजी (ता. नांदुरा) – वडनेर भोलजी गावातील ओपी हद्दीत काही ठिकाणी अवैधरित्या ज्वलनशील बायोडिझेल पदार्थांची साठवणूक व विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतरही पोलीस विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, हे विशेष!
जागृत नागरिकाची तक्रार, प्रशासनाचे दुर्लक्ष
या प्रकरणी ‘दैनिक जागृत मालक’तर्फे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे अनेक वेळा माहिती देण्यात आली होती. मात्र, आजतागायत कोणतीही कार्यवाही न झाल्याने हा प्रकार थेट बुलढाणा पोलिस कंट्रोल रूम कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पोलीस कंट्रोल रूम कार्यालयाने तत्काळ स्थानिक पोलीस विभागाला योग्य ती सूचना दिली आहे.
पोलिसांचा सहभाग?
गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार, हा अवैध बायोडिझेलचा साठा व विक्रीचा व्यवहार पोलिस कर्मचारी विक्रम राजपूत यांच्या ‘आशीर्वादाने’ सुरू असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. राशीद अली खान आणि सचिन माऊली ढाबाच्या मागील बाजूस हे व्यवहार सुरू असून, स्थानिक पोलीस स्टेशन व अधिकाऱ्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तक्रारदाराची मागणी – व्हिडिओ पंचनामा व माहिती अधिकारात अहवाल
तक्रारदाराने मागणी केली आहे की:
1. संबंधित ठिकाणी व्हिडिओ पंचनामा करून,
2. स्टेशन डायरीमध्ये नोंद घेऊन,
3. माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात देण्यात यावा.
जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास ही तक्रार उच्चस्तरीय यंत्रणांकडे सादर केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.