
अर्धा दर्जन गुन्हे उघडित आले.
२८ तोले सोने आणि २ किलो चांदीच्या आभूषण आणि नगदी हस्तगत.
मुंबई.
मुलुंड पोलिस हद्दीत झालेला एका घरफोडीच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.ज्याचा नाव राजेश अरविंद राजभर ३२ वर्ष सांगण्यात येते. आरोपीनी तपासात दिलेली माहितीनुसार त्यानी अजुन ५ गुन्हे केले होते. आरोपीला दिवसा उजेडात अटक केली.
मिळाली माहितीनुसार,गेल्या काही दिवसा अगोदर मुलुंड पोलिसांच्या हद्दीत एका घरफोडीची घटना घडली होती.पोलिसांचा तपास केल्यावर पोलिसांनी आरोपी राजेश अरविंद राजभार यांना ठाणे येथील कलवा भागातून अटक केली.जेव्हा त्या आरोपीनी कडून पोलिसांनी विचारण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने इतर ५ चोरीच्या घटना घडवून आणल्या कबूली दिली.त्यानुसार पोलिसांनी एकूण १५ लाख ६५ हजार मालामत्ता त्याचा कडून जप्त केली आहे.आणि त्यापूर्वीही त्याच्यावर अर्ध्या डझनहून अधिक खटल्यांचा आरोप करण्यात आला आहे.अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटील आणि परिमंडल ७ चे पोलिस उपायुक्त विजयकुमार सागर यांचा मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोशी यांच्या पोलिसांनी हे उत्तम कौतुकास्पद काम केले आहे.श्री विजयकुमार सागर यांच्या देखरेखीखाली मुलुंड पोलिसचे गुन्हे निरीक्षक नितीन खडगे,डिटेक्शन अधिकारी गणेश कट्टा,रमेश ढेबे,बस्तिराम बोडके आणि सचिन बॅन्सोड यांचा या तपास मधे समावेश होता.