चला धावू… निसर्गाचे संरक्षण करू – ‘रन फॉर फॉरेस्ट’
बुलढाणा – २१ मार्च, जागतिक वन दिनाच्या निमित्ताने बुलढाणा वनविभागाच्यावतीने ‘अजिंठा रन फॉरेस्ट मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली. पर्यावरण संरक्षण आणि निसर्ग रक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित या मॅरेथॉनमध्ये महिलांसाठी ३ किलोमीटर, ५ किलोमीटर, तर पुरुषांसाठी १० किलोमीटर अंतराची शर्यत घेण्यात आली.
या मॅरेथॉनमध्ये ४५० पेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग घेतला. पर्यावरण जागृती आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देत १८ वर्षांवरील महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
📷 छायाचित्र – रविकिरण टाकळकर