मुंबई: सामान्य प्रशासन विभाग (सेवा) मंत्रालय, मुंबई कक्ष IAS 2 मधील अवर सचिव श्रीमती पोतदार आणि कक्ष अधिकारी श्री. म.अ. घोंगडे हे भ्रष्ट आणि दोषी लोकसेवकांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा बोकाळली असून, प्रामाणिक नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे!
तक्रारींचे खोटे नाटक – तक्रारदारालाच अडचणीत आणण्याचा डाव!
या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर आणि बेजबाबदार पद्धतीने अनेक तक्रारींची हाताळणी केली आहे. दोषींवर कारवाई करण्याऐवजी, तक्रारदारालाच अन्यायाचा बळी बनवण्याचा हा डाव आहे! ही लोकशाही व्यवस्थेतील मोठी लाचारी असून, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात प्रशासन सोडणे म्हणजे जनतेच्या न्यायाच्या अपेक्षा संपवण्यासारखे आहे!
तक्रारकर्त्याला गप्प बसवण्याचा डाव उघड!
मी (वहीद गफ्फार खान) सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तक्रार केली. मात्र, IAS अधिकारी श्रीमती पोतदार आणि श्री. म.अ. घोंगडे यांनी तीच तक्रार दोषी अधिकाऱ्यांकडे पाठवली!
हा कायदा आहे की त्यांची खासगी सोय?
यावरून हे स्पष्ट होते की, हे अधिकारी फक्त नक्कल करून परीक्षा पास झाले आणि “सेटिंग” करून नोकरी मिळवली आहे!
अशा बोकाळलेल्या व्यवस्थेला चोख उत्तर देणार!
हे सरळसरळ जनतेच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आहे! लोकशाहीत अशा भ्रष्ट, बेजबाबदार आणि मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय मी शांत बसणार नाही!
— वहीद गफ्फार खान
मुख्य संपादक, दैनिक जागृत मालक
लेखक – Empowering Citizens: Understanding The Right to Information Act
(Book available on Amazon)
Trending
- अवैध बायो-डिझेल धंद्यांना पोलिसांचं वरून संरक्षण?
इरफानचं अमन हॉटेल बनलं ‘बायो-डिझेल’चा गैरव्यवहार केंद्र! - बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु