
नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या लगत जमिनीत मोठी टाकी लपवून त्यात ज्वलनशील पदार्थांचा साठा केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वारंवार तक्रारी आणि माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध होऊनही स्थानिक प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या अवैध धंद्यामध्ये मुनीर सेठ आणि आसिम लिडर – गुरुद्वारासमोर, वडी आणि वडनेर भोलजी दरम्यान थेट सहभागी असल्याचे समोर आले आहे. तसेच, संबंधित जमिनीचा वापर केवळ ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यासाठीच नव्हे, तर बंदूक व तलवारींच्या तस्करीसाठीही केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारीला अभय?
या प्रकरणी जागेच्या मालकावर कठोर कारवाई होणे आवश्यक असून, त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तथापि, प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेमुळे कारवाईचा अभाव दिसून येत आहे. कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली नाही, तर या साठ्यामधून भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा केवळ बेकायदेशीर साठा नाही, तर कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन चालवला जाणारा संगठित गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या भूमिकेचाही सखोल तपास होणे आवश्यक आहे.