खामगाव ग्रामीणचे उपसरपंच मोहम्मद नदीम यांच्या मेहनतीचे बीडीओ साहेब व कर्मचाऱ्यांनी केले कौतुक

खामगाव, (का. प्र.) :
प्रधानमंत्री आवास योजना २०२४-२५ अंतर्गत उपलब्ध घरे योग्य लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने २२-२-२०२५ रोजी रात्रंदिवस काम करून योग्य लोकांना लाभ मिळावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ताज नगर येथील तीस लाभार्थ्यांना उपसरपंच मोहम्मद नदीम शेख व खामगाव तालुका पंचायत समिती बी.डी. ओ साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याशिवाय उपसरपंच मोहम्मद नदीम शेख यांनी ताज नगरमध्ये राहणाऱ्या वीसहून अधिक बेघर कुटुंबांना स्वताची ६००० स्केर फोट जागा बांधण्यासाठी भेट दिली. त्यामुळे अनेक कुटुंबांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मोहम्मद नदीम शेख यांच्या या पावलाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. मोहम्मद नदीम शेख यांच्या पुढाकाराने बुलढाण जिल्ह्यातील हे पहिलेच काम आहे. या कामाचे कौतुक करून खामगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजपूत साहेब, इतर शासकीय कर्मचारी व नागरिकांनी मोहम्मद नदीम शेख यांचा सत्कार केला.