मलकापुरमध्ये मालमत्ता करवाढीचा विस्फोट!
नागरिकांमध्ये नगरपालिका विरोधात नाराजीचा सूर
मलकापुर, ८ मे:
मलकापुर नगर परिषदेकडून प्रस्तावित करण्यात आलेली मालमत्ता करवाढ शहरात प्रचंड वादाचा विषय ठरत आहे. या वाढीव कराविरोधात जागृत नागरिकांनी जोरदार भूमिका घेत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
शेख यांनी म्हटलं, “महागाईने आधीच नांगरलेल्या सामान्य नागरिकांवर आणखी कराचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे. ही करवाढ नागरिकांशी चर्चा न करता गुपचूप पद्धतीने करण्यात येत आहे, जी पूर्णपणे अलोकशाही आहे.”
शहरातील विविध भागांतून नागरिकांनीही या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकांचा आरोप आहे की, प्रशासनाने कोणतीही जनसुनावणी न करता थेट करवाढीचा निर्णय घेतला आहे, जो लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे.
“करवाढ टप्प्याटप्प्याने करावी, गरीब आणि मध्यमवर्गीयांना सवलती द्याव्यात, तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असावी,” अशी मागणी शेख आणि अनेक नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणामुळे मलकापुरमध्ये नगर परिषद प्रशासनाविरोधात असंतोषाचा लाट उठलेली असून, पुढील परिषद बैठकीत हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
Trending
- बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु
- साजिद मोहम्मद खान – निस्वार्थ सेवाभावाचा चेहरा, सचोटी आणि विश्वासार्ह नेतृत्वाचं प्रतीक