सचिनच्या बायो डिझेल पंपाला पोलिस कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद? – अवैध साठवणुकीमुळे नागरिक धास्तावले
नांदुरा– वडनेर भोलजी येथील एका नामांकित पोलिस कर्मचाऱ्याचा आशीर्वाद असल्यामुळे अवैध बायो डिझेल व्यवसाय फोफावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सचिन नावाचा इसम कोणत्याही अधिकाऱ्याची भीती न ठेवता दिवस आणि रात्र स्फोटक व ज्वलनशील पदार्थांची साठवणूक व विक्री करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन याचा बायो डिझेल पंप हा पोलिस कर्मचारी विक्रम राजपूत यांच्या आशीर्वादामुळे अवैधरीत्या सुरू आहे. विशेष म्हणजे, विक्रम राजपूत हे ‘माऊली हॉटेल’चे मालक यांचे नातेवाईक असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेची कृपादृष्टी असल्यामुळेच कारवाई होत नसल्याची चर्चा जनतेमध्ये आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे अस्वस्थता वाढली आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या बायो डिझेल पंपामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, त्याची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली जात आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा स्थानिक नागरिक आंदोलनाची भूमिका घेऊ शकतात, असे सूतोवाच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
Trending
- अवैध बायो-डिझेल धंद्यांना पोलिसांचं वरून संरक्षण?
इरफानचं अमन हॉटेल बनलं ‘बायो-डिझेल’चा गैरव्यवहार केंद्र! - बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु