Close Menu
jagrutmalak.com

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली

    June 21, 2025

    नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान

    June 4, 2025

    एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?

    May 30, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
    • नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
    • एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
    • पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
    • नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
    • गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
    • राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु
    • साजिद मोहम्मद खान – निस्वार्थ सेवाभावाचा चेहरा, सचोटी आणि विश्वासार्ह नेतृत्वाचं प्रतीक
    jagrutmalak.com
    • Home
    • News
      • National
      • International
      • Politics
      • Business
      • Sports
      • Entertainment
      • Technology
      • Health
    • E-Paper
    • Opinion
      • Columns
      • Editorials
      • Letters
    • Features
      • Special Stories
      • Investigations
      • Interviews
    • About Us
    • Contact Us
    jagrutmalak.com
    • Home
    • News
      • National
      • International
      • Politics
      • Business
      • Sports
      • Entertainment
      • Technology
      • Health
    • E-Paper
    • Opinion
      • Columns
      • Editorials
      • Letters
    • Features
      • Special Stories
      • Investigations
      • Interviews
    • About Us
    • Contact Us
    Home»Jagrut Malak»नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार
    Jagrut Malak

    नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार

    Waheed Gaffar KhanBy Waheed Gaffar KhanJanuary 6, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्यमंत्र्यांना सकल जैन समाज आणि नांदणी मठाच्यावतीने ‘प्रजागर्क’ पदवी

     

    कोल्हापूर, दि. 6 : नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला लवकरच तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा देवून मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात श्री. फडणवीस बोलत होते.

    कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असताना मला आनंद होत असून जैन समाजातील ऐतिहासिक व सर्वात मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले. नागपूर येथे जैन ट्रेड ऑर्गनायझेशन कार्यक्रमात जैन समाजातील वेगळे स्वरूप पाहता आले. आज पुन्हा याच समाजाचे आगळेवेगळे स्वरूप पाहायला मिळाले. जैन समाजातील व्यवसाय आणि व्यापारात देशासाठी योगदान देणारे लोक नागपूर येथे भेटले आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटले, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

    यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सर्वश्री डॉ.राजेंद्र पाटील – यड्रावकर, राहुल आवाडे, अमल महाडिक, अशोक माने, शिवाजी पाटील, माजी मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, जैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराज, मठाधिपती, 10 आचार्य महाराज, 7 मुनी महाराज उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वस्तुत्व महाकाव्य ग्रंथाच्या प्रतिकृतीचे प्रकाशन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने ‘प्रजागर्क’ पदवी देण्यात आली.

    नांदणी मठात एक वेगळं जीन शासन पाहायला मिळत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आचार्यांचे आशीर्वाद आणि सर्व भाविकांच्या दर्शनाचा लाभ यासाठी कार्यक्रमाला येण्याचे ठरवले. जैन तत्त्व ‘जगा आणि जगू द्या’ अशी आहेत. जगामध्ये बरेच विचार आले आणि नष्ट झाले. परंतु जैन विचार अजूनही शाश्वत आहेत. ‘जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल’ असा विचार जैन समाजाचा आहे. सर्वाधिक समाजसेवा करणारा जैन समाज असून समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. संपूर्ण जीवसृष्टी वाचविण्याचे विचार जैन विचारात आढळून येतात. समाजाला सशक्त आणि सन्मार्गावर ठेवणे हे मोठे काम आचार्य करतात. जैन समाजातील आचार्य, तीर्थंकार यांनी परंपरा आणि विचार आजही जीवित ठेवले आहेत. हेच संस्कार काल आणि स्थान यांचा विचार करीत नव्या स्वरूपात नव्या रूपाने समाजापर्यंत पोहचवले जातात.

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, धर्मशास्त्र कधीच राजशक्तीवर अवलंबून राहिले नाही. परंतु धर्मसत्तेच्या विकासाच्या यात्रेमध्ये राजसत्ता निश्चितच प्रयत्न करेल. देशातील पहिले जैन महामंडळ राज्यात स्थापन केले आहे. महामंडळाच्या सुधारणांबाबत आलेल्या सूचनांचा विचार करून युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महामंडळ अधिक बळकट करू. नांदणी मठात मिळालेल्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

    अलमट्टीबाबत गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू

    स्थानिक आमदार यांनी शिरोळ तालुक्यातील पूर नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, अलमट्टीबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचा आहे. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous Articleठाणेदार सारंग नवलकर आणि तपास अधिकारी अमोल खराडे यांच्याविरोधात पत्रकाराचे आमरण उपोषण
    Next Article बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह?
    Waheed Gaffar Khan
    • Website

    Related Posts

    आरसीएफ पोलिसांनी दोन देशी कट्टा सह एकाला केली अटक.

    April 5, 2025

    दिवसात घरफोडी करणारा आरोपी अटकेत

    April 5, 2025

    मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा – मंत्री नितेश राणे

    March 21, 2025

    चला धावू… निसर्गाचे संरक्षण करू – ‘रन फॉर फॉरेस्ट’

    March 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Our Picks

    साजिद मोहम्मद खान – निस्वार्थ सेवाभावाचा चेहरा, सचोटी आणि विश्वासार्ह नेतृत्वाचं प्रतीक

    May 12, 2025

    कोंढवा खुर्द परिसरात कचऱ्याचा ढिगारा; नागरिकांच्या आरोग्यावर धोका

    April 8, 2025

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss

    बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली

    By Waheed Gaffar KhanJune 21, 20250

    बुलढाणा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पोलीस व्यवस्थेत मोठा फेरबदल करत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे…

    नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान

    June 4, 2025

    एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?

    May 30, 2025

    पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!

    May 28, 2025

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms of Services
    • Disclaimer
    © 2025 Jagrutmalak. Designed by Xortechs- 8532089493

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    WhatsApp us