Author: Waheed Gaffar Khan

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार मुंबई, दि. २१ : मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकीदरम्यान केल्या. मंत्रालयात आज मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांच्याशी महावाणिज्य दूत श्री. ओस्टबर्ग यांनी ई-वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. यावेळी श्री. ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. राणे यांनी सांगितले की, मुंबई महानगरामध्ये वाहतूक यंत्रणेवर…

Read More

चला धावू… निसर्गाचे संरक्षण करू – ‘रन फॉर फॉरेस्ट’ बुलढाणा – २१ मार्च, जागतिक वन दिनाच्या निमित्ताने बुलढाणा वनविभागाच्यावतीने ‘अजिंठा रन फॉरेस्ट मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली. पर्यावरण संरक्षण आणि निसर्ग रक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित या मॅरेथॉनमध्ये महिलांसाठी ३ किलोमीटर, ५ किलोमीटर, तर पुरुषांसाठी १० किलोमीटर अंतराची शर्यत घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये ४५० पेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग घेतला. पर्यावरण जागृती आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देत १८ वर्षांवरील महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 📷 छायाचित्र – रविकिरण टाकळकर

Read More

मुंबई: सामान्य प्रशासन विभाग (सेवा) मंत्रालय, मुंबई कक्ष IAS 2 मधील अवर सचिव श्रीमती पोतदार आणि कक्ष अधिकारी श्री. म.अ. घोंगडे हे भ्रष्ट आणि दोषी लोकसेवकांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा बोकाळली असून, प्रामाणिक नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे!तक्रारींचे खोटे नाटक – तक्रारदारालाच अडचणीत आणण्याचा डाव!या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर आणि बेजबाबदार पद्धतीने अनेक तक्रारींची हाताळणी केली आहे. दोषींवर कारवाई करण्याऐवजी, तक्रारदारालाच अन्यायाचा बळी बनवण्याचा हा डाव आहे! ही लोकशाही व्यवस्थेतील मोठी लाचारी असून, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात प्रशासन सोडणे म्हणजे जनतेच्या न्यायाच्या अपेक्षा संपवण्यासारखे आहे!तक्रारकर्त्याला गप्प बसवण्याचा डाव उघड!मी (वहीद गफ्फार खान)…

Read More

बुलढाणा : दिनांक १९/०३/२०२५ रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी रफीक सैय्यद (पाटील) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रफीक पाटील हे अनेक वर्षापासून अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवीत आहेत , त्यांच्या माध्यमातून संघटनेचा सक्षमपणे विस्तार होण्यासाठी तसेच अ भा छा संघटनेचा प्रसार होण्यासाठी उत्कृष्ट मदत होत असून शेवटच्या घटकापर्यंत संघटनेचे विचार त्यांच्या लेखणीतून पोहचवण्याचे कार्य करत असल्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशाने, अखिल भारतीय छावा बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांनी बुलढाणा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी रफीक सैय्यद (पाटील) यांची नियुक्ती केली आहे.बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नियुक्ती केल्यानंतर…

Read More

शिक्षण महर्षी एम आर देसाई यांनी बहुजनांच्या शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला;   प्राचार्य एस.पी.पाटीलकागल चे पहिले आमदार एम.आर.देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन इंग्रजी शिक्षणामुळे चौकस आणि बुद्धीवादी बनलेल्या शिक्षण महर्षी एम.आर.देसाई आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यासारख्या ध्येयवादी बनलेल्या तरुणांनी  सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी ग्रामीण भाग वाडा वस्त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात शैक्षणिक संस्था उभा केल्या.शिक्षण महर्षी एम.आर.देसाई यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून बहुजनांच्या शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला,” असे प्रतिपादन मुरगुड विद्यालय ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य एस.पी.पाटील यांनी केले.    ते मुरगुड विद्यालय ज्यूनिअर कॉलेज येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्राचार्य एम आर देसाई यांचा स्मृतिदिनी इंग्लिश दिवसानिमित्त विविध…

Read More

सायली गायकवाड – खेड तालुक्यातील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने बौद्ध समाज मैत्रेय रॅलीचे आज मंगळवार दि. 18 मार्च 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक राजगुरुनगर ते तहसील कार्यालय तसेच प्रांत अधिकारी कार्यालय, खेड अशा पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. सदर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात खेड तालुक्यातील कानाकोपऱ्यातून बौद्ध समाज एकत्रित झाला होता. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो, विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,महाबोधी बुद्ध विहार 1949 चा कायदा रद्द झालाच पाहिजे. अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. बोधगया येथील महाबोधी महाविहार, जिथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, हे स्थळ बौद्ध समुदायासाठी अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. दुर्दैवानं, १९४९…

Read More

बुलढाण्यात माफियांचा हैदोस! प्रामाणिक अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्याबुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती-माती तस्करी, गांजा तस्करी आणि अन्य अवैध धंद्यांचे जाळे बळकट होत चालले आहे. जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय वरदहस्त लाभलेल्या माफियांच्या संगनमताने हे गोरखधंदे खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, प्रामाणिक अधिकाऱ्यांना धमकावून किंवा त्यांना खोट्या प्रकरणांत अडकवून बाजूला करण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले आहे.मेल एक्सप्रेस ट्रेनमधून गांजाची तस्करी!संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर आणि नांदूरा रेल्वे स्टेशनवरून दररोज एक क्विंटलहून अधिक गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती समोर आली आहे. मेल एक्सप्रेस ट्रेनद्वारे मोठ्या प्रमाणावर गांजा वाहतूक केली जाते आणि तो स्थानिक आणि…

Read More

बुलढाण्यात माफियांचा राजकीय शिरकाव! तस्करांनी राजकीय पदे मिळवून वाढवले गुन्हेगारीचे साम्राज्य मोताळा ( बुलडाणा ):बुलढाणा जिल्ह्यातील माफिया आणि तस्करांनी प्रामाणिक अधिकाऱ्यांविरुद्ध कट रचण्याचे नवे तंत्र अवलंबले आहे. मोताळ्यातील नायब तहसीलदार कौतुकराव विष्णाजी रावळकर (वय ५२, रा. छत्रपती नगर, धाड नाका, बुलढाणा) यांना अँटी करप्शन विभागाने (ACB) ताब्यात घेतले असले, तरी त्यांच्याविरोधात ही कारवाई नियोजनबद्ध कटाचा भाग असल्याची चर्चा रंगली आहे. माफियांनी पाडलेलं षड्यंत्र? बुलढाणा जिल्ह्यात माती व रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, काही भ्रष्ट अधिकारी त्याला मूकसंमती देत आहेत. मात्र, नायब तहसीलदार रावळकर यांनी हा अवैध व्यवसाय थांबवण्याचा प्रयत्न केला आणि माफियांनी त्यांना अडचणीत आणण्यासाठी कट रचल्याचे बोलले जात…

Read More

पैशाच्या लालसेत RO पाणी विक्रेते बनले मृत्यूचे सौदागर!?सावधान! विवाह सोहळे व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे थंड पाणी आरोग्यास घातक?सध्या विवाह सोहळे, समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर जारमधील थंड पाणी दिले जाते. मात्र, हे पाणी फ्रीज किंवा मशीनमध्ये थंड न करता त्यामध्ये ‘इथलीन ग्लायकॉल’ सारखे केमिकल मिसळून त्वरित थंड करण्यात येते, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.केमिकलयुक्त पाणी आरोग्यास गंभीर धोका!तज्ज्ञांच्या मते, इथलीन ग्लायकॉल आणि तत्सम रसायने पाण्यात मिसळल्याने त्याचा फ्रीझिंग पॉईंट कमी होतो आणि पाणी पटकन थंड होते. मात्र, असे पाणी प्यायल्याने उलटी, मळमळ, किडनीचे आजार, हृदयविकार आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते.RO प्लांट पुरवठादार करत आहेत विषारी…

Read More

खामगाव ग्रामीणचे उपसरपंच मोहम्मद नदीम यांच्या मेहनतीचे बीडीओ साहेब व कर्मचाऱ्यांनी केले कौतुक खामगाव, (का. प्र.) : प्रधानमंत्री आवास योजना २०२४-२५ अंतर्गत उपलब्ध घरे योग्य लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी खामगाव ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने २२-२-२०२५ रोजी रात्रंदिवस काम करून योग्य लोकांना लाभ मिळावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ताज नगर येथील तीस लाभार्थ्यांना उपसरपंच मोहम्मद नदीम शेख व खामगाव तालुका पंचायत समिती बी.डी. ओ साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याशिवाय उपसरपंच मोहम्मद नदीम शेख यांनी ताज नगरमध्ये राहणाऱ्या वीसहून अधिक बेघर कुटुंबांना स्वताची ६००० स्केर फोट जागा बांधण्यासाठी भेट दिली. त्यामुळे अनेक कुटुंबांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण…

Read More