
बुलढाणा (प्रतिनिधी): मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील धरणगाव-मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील फौजी ढाब्यावर अवैध बायो डिझेल विक्री पुन्हा सुरु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी ठाणेदार गणेश गिरी यांनी या ठिकाणी छापा टाकत पंप सील केला होता, मात्र काही दिवसांतच तो पुन्हा सुरु झाल्याने पोलीस प्रशासन आणि कायदा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बायो डिझेल विक्रीत साबीर, जुबेर, इम्रान उर्फ बॉस आणि ऍडव्होकेट शेख यांचा सहभाग असून, यातील काहीजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, जुबेर व ऍडव्होकेट शेख यांना अद्याप आरोपी करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, ऍडव्होकेट शेख यांचे वरिष्ठ प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक राजकीय नेत्यांशी घनिष्ट संबंध असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, राजकीय दबावामुळे संबंधितांवर कठोर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कायद्याचा धाक कमी होत असून, महसूल आणि पुरवठा यंत्रणा दबावात काम करत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनाने तात्काळ याची गंभीर दखल घ्यावी व पारदर्शक चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
साबीर, जुबेर, इम्रान बॉस आणि ऍडव्होकेट शेख यांचा बायो डिझेल रॅकेट आता वडनेर भोलजी पोलीस स्टेशन नांदुरा हद्दीत एक आणखी अवैध बायो डिझेल पंप सुरू करणार आहे अशी सूचना मिळाली आहे,