नम्र विनंती
बुलढाणा जिल्ह्यातील दैनिक जागृतचे प्रतिनिधी श्री. सईद खान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी व निंदनीय प्रकार आहे. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर व सत्यशोधनाच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला हल्ला आहे.
पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्वरित आणि कठोर कारवाई व्हावी, तसेच श्री. सईद खान व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही सर्व पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते आणि जागृत नागरिकांना आवाहन करतो की:
1. जिल्हाधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करा.
2. आपल्या गावात, शहरात आणि जिल्ह्याच्या पातळीवर एकत्र येऊन या प्रकरणाविरोधात आवाज उठवा.
3. गुंड प्रवृत्तीविरोधात ठाम भूमिका घेत न्याय व पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी लढा द्या.
4. शांततापूर्ण मोर्चे, सभांद्वारे जनजागृती करा आणि प्रशासनावर दडपण आणा.
ही आपली जबाबदारी आहे की सत्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभे राहावे.
आज आपण एकत्र आलो नाही तर उद्या पुन्हा असे प्रकार घडतील, म्हणूनच आजच्या संघर्षाने भविष्यातील हल्ल्यांना रोखण्याचे काम करूया.
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, ती ढासळू देणार नाही!
सर्वांनी आपल्या स्तरावर त्वरित पाऊले उचलावीत, ही नम्र विनंती आहे.
आपला सहकारी,
वहीद गफ्फार खान
संपादक
दैनिक जागृत मालक
Trending
- बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु
- साजिद मोहम्मद खान – निस्वार्थ सेवाभावाचा चेहरा, सचोटी आणि विश्वासार्ह नेतृत्वाचं प्रतीक