Author: Waheed Gaffar Khan

मुंबई, दि. 1 : शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान/ भरडधान्य खरेदी केले जाते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत होती. मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार राजू कारेमोरे…

Read More

      मुंबई, दि. 1 : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील दालनात त्यांच्या विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावाही घेतला. यावेळी सहसचिव कैलास गायकवाड, सहसचिव  अरुण कोल्हे, सहसचिव संजय इंगळे यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव यांनी  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Read More

मुंबई, दि. 1 :  अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना श्री.झिरवाळ यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Read More

सार्वजनिक आरोग्य विभागाचा घेतला आढावा मुंबई, दि. १ : रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून राज्यातील जनतेचे आरोग्य जपण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, औषधे आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची त्रयस्थ पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देशही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.  आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी विभागाचा आढावा घेतला. बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव नवीन सोना, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे…

Read More

माओवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्वीकारावा * ताराक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण * स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरु * लॉईडच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, 6200 कोटींची गुंतवणूक, 9000 रोजगार * कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान * गडचिरोलीपासून 200 कि.मी. दूर पेनगुंडा येथे जवान, ग्रामस्थांशी संवाद * सी-60 जवानांचाही सत्कार * पोलीस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण गडचिरोली, दि. 1  : नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेवून आला असून विकासाच्या,  सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली…

Read More

मुंबई, दि. १ : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करावे, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळेल व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असे त्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री ॲड. शेलार यांनी आढावा घेतला. या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली…

Read More

नम्र विनंतीबुलढाणा जिल्ह्यातील दैनिक जागृतचे प्रतिनिधी श्री. सईद खान आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी व निंदनीय प्रकार आहे. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर व सत्यशोधनाच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला हल्ला आहे.पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्वरित आणि कठोर कारवाई व्हावी, तसेच श्री. सईद खान व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही सर्व पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते आणि जागृत नागरिकांना आवाहन करतो की:1. जिल्हाधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करा.2. आपल्या गावात, शहरात आणि जिल्ह्याच्या पातळीवर एकत्र येऊन या प्रकरणाविरोधात आवाज उठवा.3. गुंड प्रवृत्तीविरोधात ठाम भूमिका घेत न्याय व पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी लढा…

Read More

नांदुरा येथील पंचर गँगची दहशत, पोलीस कारवाईचे प्रश्‍नचिन्ह नांदुरा (प्रतिनिधी): नांदुरा तालुक्यातील खुमगाव बुर्ती येथील अनंता प्रकाश काळे (वय ५३) या आपल्या पतीसोबत दवाखान्याच्या कामासाठी खामगावला जात असताना २६ डिसेंबर रोजी त्यांच्यावर दरोडा टाकण्यात आला. खामगाव येथील किड्स युनिव्हर्स इंग्लिश शाळेजवळील गतीरोधकाजवळ, दुचाकीचा वेग कमी केल्यावर पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरील दोन अज्ञात व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या पतीच्या गळ्यातील ७०,००० रुपये किमतीची सोन्याची पोथ हिसकावली आणि खामगावच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणी जलंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, अज्ञात इसमांविरुद्ध ३०९ (४), ३(५) भादंवीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे नांदुरा परिसरात पुन्हा एकदा कुख्यात “पंचर…

Read More

पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके – ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस (एकूण ०५ पिके)स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा अर्जासोबत सादर करावा. रब्‍बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पीक…

Read More

पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनमुंबई, दि. ३ : राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. …

Read More