Author: Waheed Gaffar Khan

                  पंढरपूर दिनांक 29: – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झालेले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.               यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आदी उपस्थित होते.

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनपंढरपूर, दि.29 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, अभिजीत पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कल्याणशेट्टी, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार राम सातपुते, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे पूजन पुणे, दि. 29 : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.            स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक येथे समाधीस्थळी आयोजित संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महंत रामगिरी महाराज तसेच वढू ग्रामपंचातीचे पदाधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही साधू-संतांची, वीरांची…

Read More

पुणे, दि. २९: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह देशमुख, माजी आमदार राम सातपुते, मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते. प्रदक्षिणावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यातील कामांच्या प्रगतीची अधिकाऱ्यांकडून व विश्वस्तांकडून माहिती घेतली. मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, विश्वस्त अभय कुमार वांकर, डॉ. प्रशांत सुरू यांनी देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.…

Read More

मराठी अभिजात भाषा झाल्याचा आनंद साजरा करावा मुंबई,दि.29: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर येत असलेला हा पहिला गुढी पाडवा सर्वानी नव्या उत्साहाने साजरा करावा असे आवाहन करतो व गुढीपाडवा तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्‍ताने देखील सर्वांना शुभेच्छा देतो. नवे वर्ष सर्वांकरीता सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.

Read More

Ø केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थितीØ एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात नागपूर, दि. 29 – वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले. मिहान परिसरात आयोजित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार श्यामकुमार बर्वे, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून…

Read More

विकासाची महागुढी उभारू या! राष्ट्रधर्म वाढवू या!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या शुभेच्छानूतन वर्ष सर्वांच्या जीवनात,सर्व क्षेत्रात नवचैतन्य, ऊर्जा घेऊन येवो मुंबई, दि. २९:- महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या जीवनात आणि उद्योजकता, व्यापार – उदीम अशा सर्वच क्षेत्रात नवचैतन्य, ऊर्जा घेऊन येवो. सर्वांकरिता सुख- समृद्धी, समाधान आणि भरभराटीचे क्षण…

Read More

खामगांव (जिल्हा बुलढाणा): खामगांव बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले असून, यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. मात्र, स्थानक प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, खामगांव बस स्थानक प्रमुख स्वाती तांबटकर आणि अन्य स्थानक प्रशासनातील व्यक्ती हे ठराविक व्यावसायिकांकडून अवैध मार्गाने पैसे स्वीकारत असून, त्यांना मनमानीपणे मोठे बॅनर आणि पोस्टर लावण्याची परवानगी दिली जात आहे. परिणामी, प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या स्थानकाच्या भिंती आणि परिसर जाहिरातींनी भरून गेले आहेत.स्थानक परिसरातील अनधिकृत जाहिरातींमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. प्रवासी बस वेळापत्रक पाहू शकत नाहीत, तसेच या बॅनरमुळे परिसर अस्वच्छ आणि अनागोंदी झाल्याचे…

Read More

चिखली – अवैध दारूविक्रेत्याचा पाठलाग करताना झालेल्या भीषण अपघातात अंढेरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर पोलिस कॉन्स्टेबल राम आंधळे गंभीर जखमी झाले. ही घटना आज दुपारी १:३० वाजेच्या सुमारास मिसाळवाडी ते शेळगाव आटोळ रस्त्यावर घडली. पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.काय घडले?- पाठलाग आणि अपघात:    शेळगाव आटोळजवळील एका ढाब्यावर अवैध दारूविक्री करणारा शिवणकर हा संशयित आज दारूचे बॉक्स घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. भागवत गिरी आणि राम आंधळे यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला, पण तो पळून जाऊ लागला. पाठलागादरम्यान, मिसाळवाडी फाट्यापुढे शिवणकरने पोलिसांच्या भरधाव दुचाकीला लाथ मारली.…

Read More

मुंबई, दि. 22 : गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये गेल्या पाच वर्षात वाघ्र हल्ल्यातील मृत्यूमुखींच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणे, अतिरिक्त वाघांचे स्थलांतर आदींचा समावेश असून त्याचा अहवाल तीन महिन्यात देण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वाघांच्या हल्ल्यातील नागरिकांच्या जिवीत हानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी तेथील नागरिकांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन यावर उपाय योजना सुचविण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार…

Read More