मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर, दि.29 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, अभिजीत पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कल्याणशेट्टी, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार राम सातपुते, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यामध्ये श्री विठ्ठल गर्भगृह, श्री रुक्मिणी गर्भगृह, श्री विठ्ठल चारखांबी व सोळखांबी, बाजीराव पडसाळी, महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
Trending
- अवैध बायो-डिझेल धंद्यांना पोलिसांचं वरून संरक्षण?
इरफानचं अमन हॉटेल बनलं ‘बायो-डिझेल’चा गैरव्यवहार केंद्र! - बुलढाणा जिल्ह्यात मोठी पोलिस खातेस्तरावर हालचाल – चार पोलीस निरीक्षकांची तात्पुरती बदली
- नशेच्या अवस्थेत अहवाल सादर करणारे SDPO सुधीर पाटील यांना शिपाई पदावर पाठवा: वहीद खान
- एसपी ऑफिसमध्ये तणाव! खुर्चीसाठी पेच वाढला – जिल्ह्याचे एसपी नेमके कोण?
- पंतप्रधान शहरी आवास योजना : शहरी गरीबांसाठी घरकुलाचे स्वप्न साकार होण्याची सुवर्णसंधी!
- नशेच्या धुंदीत तक्रारींचा खेळखंडोबा? – बुलढाणा SP कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलवर गोंधळ
- गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांची हलगर्जी! शकील तडवी व नवाज शेख यांनी कारवाईऐवजी विक्रेत्याला दिली मोकळीक
- राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा धोका : वडनेर भोलजी ओ.पी हद्दीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ज्वलनशील बायोडिझेलचा अवैध व्यापार सुरु