पोलिसांनी हिटलिस्टवरील अन्य आठ ते दहा सराईत गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

बुलढाणा: नांदुरा शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे यांनी नांदुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री. विलास पाटील यांना सराईत गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात निमगाव शिवारामध्ये नागपूर येथील व्यापाऱ्यांना भंगार सामान व कॉपर स्वस्त दरात विक्रीच्या आमिषाने बोलावून १० लाख रुपयांचा ऐवज लुटला गेला होता. या प्रकरणाचा तपास ठाणेदार श्री. विलास पाटील यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घेतला. त्यांनी सराईत दरोडेखोरांना अटक करून जेलमध्ये पाठवले आणि त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मोक्का) कलमांतर्गत कठोर कारवाई केली. यामुळे आरोपींना दीर्घ कालावधीपर्यंत कारागृहात राहावे लागणार आहे.
तसेच, नांदुरा शहर व तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत ‘पंक्चर डॉन’ म्हणून ओळखला जाणारा ताहीर अहमद जमीर अहमद (वय ३५, राहणार पेठ मोहल्ला, नांदुरा) याचाही समावेश आहे. ताहीर अहमदविरोधात MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पानसरे यांच्या शिफारसीवरून जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आणि ताहीर अहमदला एक वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. यानुसार, ताहीर अहमदला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले.
नांदुरा पोलिसांच्या या प्रभावी कारवाईने दरोडेखोर व सराईत गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी हिटलिस्टवरील अन्य आठ ते दहा सराईत गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे नांदुरा शहर व तालुक्यातील नागरिकांना निर्भय व सुरक्षित वातावरण मिळेल.
ठाणेदार श्री. विलास पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली ही महत्त्वपूर्ण कारवाई कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी एक आदर्श ठरली आहे.
पंचर गँग सदस्यांची अधिकृत सूची
1. ताहीर अहमद जमीर अहमद अब्दुल कादर (उर्फ पंचर डॉन)
गंभीर गुन्हे:
अवैध बंदूक तस्करी
बनावट नोटांचे प्रकरण
बनावट रेती रॉयल्टीचे व्यवहार
तलवारी व काडतूसांचा साठा
खंडणी वसूल करणे
मंदिराच्या जमिनीवर हिरवे झेंडे लावून जातीय तणाव निर्माण करणे
हवाला नेटवर्कद्वारे विदेशातून बेकायदा फंडिंग
गुन्ह्यांचा कार्यक्षेत्र:
अकोला व बुलढाणा जिल्ह्यात अनेक FIR नोंद
—
2. शेख साकीब शेख लकी टेलर (उर्फ मुर्गी चोर)
कार्य:
लहान गुन्हेगारी व मुर्गी चोरीचे प्रकरण
पंचर डॉनचे निकटचे सहकारी
—
3. शेख राजिक शेख रहीम (उर्फ तोत्या पत्रकार)
कार्य:
पत्रकारितेचा मुखवटा घेऊन गुन्हेगारीत सक्रिय आणि पंचर गँग साठी वसुली कामगिरी आणि पोलीस स्टेशन व इतर ठिकाणी लक्ष ठेवणे
—
4. शेख नजीर शेख बुढन उर्फ चाटुकार पत्रकार घासलेट वाले
कार्य:
पंचर डॉनचा विश्वासू खबरी आणि तोडपाणी आणि गुन्हेगारीत सहाय्य
—
5. इंतेजार हुसेन सफदर हुसेन
कार्य:
पंचर डॉनचा अंगरक्षक
सुरक्षा व्यवस्थापन
—
6. शेख मुदस्सिर शेख मुस्तफा (उर्फ राजा बंदूक तस्कर)
गुन्हे:
मुख्यतः अवैध बंदूक आणि हत्यार तस्करी
—
7. एजाज गोश मांडा, राजा बंदूक तस्कर चा चुलत भाऊ
कार्य:
पंचर गँग साठी आर्थिक वसुली, प्रॉपर्टी व्यवस्थापन व तोडपाणी, देसी बंदूक आणि तलवार तस्करी मध्ये सहकार्य
8. गफूर तोडी मास्टर
राजनीतिक पुढारी पंचर गँग यांचा टपाल
ही गँग अकोला व बुलढाणा जिल्ह्यांत कुप्रसिद्ध असून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या गँगच्या कारवायांवर लक्ष केंद्रित करून कठोर कारवाईची गरज आहे.