नांदुरा तहसीलदार साहेबांनी केला आव्हान
बुलढाणा, 23 एप्रिल 2025:
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काही महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिवारातील कोणी सदस्य किंवा ओळखीची व्यक्ती त्या परिसरात पर्यटक म्हणून गेले असल्यास, तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
संपर्कासाठी खालील क्रमांक व ई-मेल उपलब्ध आहेत:
1. जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
फोन: 07262-242683
मोबाईल: 7020435954
ई-मेल: rdc_buldhana@rediffmail.com
2. जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष
फोन: 07262-242400
डॉ. जयश्री ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व तहसीलदार, जिल्हा पोलिस व माहिती विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व नागरिकांनी या परिस्थितीत शांतता राखून, आवश्यक ती माहिती प्रशासनाला त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.